अभ्यासक्रमाचा उद्देश:
या पाठ्यक्रमाचा मुख्य उद्देश्य हे मुलांच्या मूलभूत वाचन क्षमतेचे आकलन करण्याचा एक सोपा आणि सरळ मार्ग दर्शविणे आहे. हे मूल्यांकन प्राथमिक स्तरावर शिकणाऱ्या सर्व मुलांसाठी सहज करता येते. हे wwww वर आधारित आहे म्हणजे कधीही (whenever), कुठेही (wherever), जे काही (Whatever) आणि कोणीही (whosever) अर्थात कधीही, कुठेही, काहीही आणि कोणीही मॉडेल वर आधारित आहे. या अभ्यासक्रमाचा उपयोग अशा धोरणांची आखणी करण्यासाठी केला पाहिजे ज्यात सर्व मुलांचा समान सहभाग असेल आणि प्रत्येक मुलाला त्याच्या गरजेनुसार शिकण्याची समान संधी मिळेल.
सदर अभ्यासक्रम सामग्री सर्व पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांमध्ये जे भाषा-निर्माण क्षमता विकसित करण्यात गुंतलेले आहेत अशा शिक्षकांसाठी उपयुक्त ठरू शकते.या कोर्समध्ये संकल्पनांची श्रेणी स्पष्ट करणारे चार मोड्यूल आहेत. आणि ही वाचन सामग्री सुलभ व्हिडीओच्या स्वरूपात उपलब्ध आहे. हा कोर्स पटकन आणि सहज करता येतो. मुलांच्या मूलभूत वाचनाच्या पातळीबद्दल जाणून घेऊ इच्छित असलेल्या कोणालाही हे करता येते. मुलांच्या वैयक्तिक मूल्यांकनासाठी स्वरूप आणि साधने डाउनलोड केली जाऊ शकतात. मुलांची वाचन क्षमता वाढवण्यासाठी आणि साध्य करण्यासाठी सहाय्यक संसाधन साहित्य देखील प्रदान केले जाते.
या भागात मुलांच्या मूलभूत वाचनाचे मूल्यांकन कसे करावे याचे महत्व सहभागींना सांगण्यात आले आहे. या भागात वाचन चाचणीतील कार्यांची रूपरेषा दिली गेली आहे.
वाचन चाचणीचे मूल्यांकन सुरु करण्यापूर्वी मुलांसाठी सहज वातावरण कसे निर्माण करावे याची क्रमा-क्रमाने प्रक्रिया या भागात दिली आहे.
या भागात, वाचन चाचणीबद्दल अधिक सखोल माहिती दिली गेली आहे, तसेच वेगवेगळ्या स्तरावरील मुले (गोष्ट, परिच्छेद, शब्द, अक्षर आणि प्रारंभिक) कशी ओळखावी हे सांगितले गेले आहे. केस स्टडीजचा उपयोग करून सहभागींना मूल्यांकनाची प्रक्रिया शिकण्यास मिळेल.
या भागात, प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक स्तराची नोंद कशी करावी, मुलांच्या गटाच्या निष्कर्षांचा सारांश कसा ...... हे निष्कर्ष एका सोप्या पद्धतीने कसे पाहावेत व समजून घ्यावे हे सहभागींना समजण्यास मदत होईल. या भागात मुलांची प्रगती कशी पाहत राहावी हे सहभागींना सांगितले गेले आहे.
नोट: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड द्वारा प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने सदर 'फाउंडेशनल लिटरेसी अँड न्युमरेसी' (एफएलएन) कार्यक्रमाच्या अभ्यासक्रमाची सामग्री तयार केली आहे.